जम्मू-काश्मीरसाठी १ हजार ३५० कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा

श्रीनगर-आर्थिक संकटाला सामोरं जात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील उद्योगांसाठी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तब्बल १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.
यावेळी उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटास सामोरं जात असलेल्या उद्योगांसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना मला आनंद होता आहे.
ही पॅकेज आत्मनिर्भर भारत आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपायांव्यतिरक्त असेल. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही चालू आर्थिक वर्षात कोणत्याही अटीशिवाय व्यावसायिक वर्गाशी निगडीत प्रत्येक कर्जदारास पाच टक्के व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा सहा महिन्यांसाठी असेल, यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल व राज्यात रोजगार निर्माण होण्यात मदत मिळेल.
याशिवाय वर्षभरासाठी वीज आणि पाणी पट्टीमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे. याचबरोबर सर्व उधार घेणाऱ्या प्रकरणांमध्ये मार्च २०२१ पर्यंत स्टॅम्प ड्यूटीतही सूट देण्यात आली आहे.