जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र कडून अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाची सुरुवात

0 12

अहमदनगर- जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील कासम खानी मशिदी येथे अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियानामध्ये 22 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत सर्व नगरकरांना या स्टॉलवर इस्लाम धर्माच्या विविध ग्रंथ मिळणार आहे.

राज्यातील बंधू-भगिनी करिता राज्यव्यापी अभियान अंधारातून प्रकाशाकडे मोठ्या शहरापासून तर छोट्या वस्तीपर्यंत चालवणार आहे कोरोना महारोगाच्या छायेत शारीरिक अंतर पाळताना समाज महामारी मुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रात पसरलेले घनघोर अंधार कसे दूर करता येईल आणि उज्वल वर्तमान व भविष्य साठी अखंड प्रकाश कसा तेजोमय राहील याकरिता या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे .

या अभियानात जमाअत ए इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिजवान रहमान खान समवेत नितीन थोरात, रतन भोसले, जमाअत ए इस्लामी हिंदचे शहर व जिल्हा अध्यक्ष अख्तर सहाब आदीसह जमाअत ए इस्लामी हिंदचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिजवान रहमान खान म्हणाले की समाजामध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे व समाजाचा वातावरण देखील बिघडत आहे या उद्देशाने व कोरोना महामारी मध्ये माणूस हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुरावला आहे व जमात-ए-इस्लामी च्या माध्यमातून हे अभियान राबून या कारणावरून नागरिकांना आकर्षित करून येणारे अडीअडचणी समजून घेऊन हे कशामुळे येत आहे त्याचे कारण की मानवाने आपल्या ईश्वराला विसरून आपले कार्य चालू ठेवले आहे.

Related Posts
1 of 1,291

मानव ईश्वराचे संबंध संपले असून जमात-ए-इस्लामी च्या वतीने मानव निर्मिती व मानव निर्माता या मध्ये आपले समझोता जुळावा या हेतूने या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे जीवनामध्ये माणसाने धर्माप्रमाणेच चांगले कार्य केले पाहिजे व समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी समाजातील अंधार दूर करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: