जगातली कोणतीही ताकत मला हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पिडीत कुटुंबाला भेटण्या पासून रोखू शकत नाही-राहुल गांधी 

0 48

हाथरस –  येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडिताच्या कुटुंबांना १ ऑक्टोंबर रोजी भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती.


तसेच त्यांच्यावर आणि दोनशे काँग्रेस कार्यकर्ता वर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु आज परत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी पीडिताच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

ते म्हणाले जगातली कोणतीही ताकत मला हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पिडीत कुटुंबाला भेटण्या पासून रोखू शकत नाही. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर तसेच युपी पोलीस वर सुद्धा टीका केली आहे ते म्हणाले या गोंडस मुलीवर आणि त्याच्या कुटुंबावर उत्तर प्रदेश सरकारकडून तसेच उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेली वागणूक मला मान्य नाही हे कोणत्याही भारतीयांनी मान्य करू नये असा अहवान सुद्धा त्यांनी टि्वट द्वारे केला आहे.

Related Posts
1 of 1,357

दरम्यान एक अक्टोबर रोजी झालेल्या धक्काबुक्की बद्दल त्यांनी थेट आरोप उत्तर प्रदेश पोलिसावर लावून त्यांनी सांगितलं होतं की मला यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर सुद्धा टीका केली होती ते म्हणाले होते या देशात फक्त नरेंद्र मोदी चालू शकतात का सर्वसामान्य भारतीयांना या देशांमध्ये चालण्याचा अधिकार आहे का नाही? असा प्रश्न त्यांनी एक ऑक्टोंबर रोजी झालेल्या घटनेनंतर मांडला होता .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: