जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकारला आस्था नाही- स्मितल वाबळे

0 29

श्रीगोंदा –  केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षात अनेक शेतकरी हुतात्मा झाले आहेत. जगाचा पोशिंदा असणाऱ्या जवळपास ६० अन्नदात्यांचे संसार उघडे पडले आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना मँट कोर्टाचा मोठा दिलासा

त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दि.८ रोजी संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी  “एक दीया शहीदो के नाम” हा उपक्रम राबवून अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व श्रीगोंदा तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे व माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोहर पोटे यांनी निषेध व्यक्त केला.

Related Posts
1 of 1,292

यावेळी शहराध्यक्ष मनोहर पोटे, युवक काँग्रेस महासचिव प्रशांत ओगले, अहमदनगर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे, नगरसेवक प्रशांत गोरे, सतीश मखरे, गणेश भोस,निसार भाई बेपारी, समीर बोरा,युवक शहर अध्यक्ष योगेश मेहेत्रे, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष धिरज खेतमाळीस, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जैद आत्तार, प्रशांत सीदनकर,सचिन गायकवाड, शशिकांत जाधव,इमाद इनामदार, शिवप्रतिक शेळके, डॉ. सागर कोथिंबीरे,सोमनाथ जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते.

                 हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: