चौघांच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा 

0 63
Related Posts
1 of 2,107

अहमदनगर :  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथील २० ऑगस्ट रोजी झालेल्या चौघांच्या खुनाचा अखेर उलगडा लागला . जळगाव येथू स्वस्तात सोने खरेदीच्या अमिषापोटी २० ऑगस्टला सायंकाळी नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे , प्रेमराज रमेश पाटील , योगेश मोहन ठाकूर (सर्वांचे वय २२), कल्पना किशोर सपकाळ (वय ४०), , आशाबाई जगदीश सोनवणे ( वय ४२ राहणार हरिविठ्ठलनगर , जळगाव ) हे सर्व ३ लाख रुपये घेऊन विसापूर फाट्याजवळ पोहोचले असता दरोडेखोरांनी सापळा रचून आधी ३ लाख रुपये ताब्यात घेतले आणि मग हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जळगावच्या १ तरुणाने चौघांवर सपासप वार केले असता         नातिक कुंजीलाल चव्हाण , श्रीधर कुंजीलाल चव्हाण , नागेश कुंजीलाल चव्हाण (सुरेगाव , श्रीगोंदा ), लिंब्या हबऱ्या काळे(देऊळगावसिद्धी ,नगर ) यांचा मृत्यू झाला .जळगावला परत जाताना आरोपींनी चाकू कन्नड घाटात फेकून दिला ,दरम्यान जळगावच्या या ५ आरोपींना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले . अक्षदा कुंजीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी तपास चालू असल्याचे सांगितले आहे  . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: