चैतन्य कानिफनाथाच्या मंदिर जिर्णोद्धाराच्या खोदकामात प्राचीन मुर्त्या व अवषेश सापडले

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सुमारे ८०० वर्षापुर्वीचे कानिफनाथाचे मंदिर

0 34
  • मिरी – येथील चैतन्य श्री कानिफनाथ मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम सुरु असताना या जुन्या मंदिरात अतिशय प्राचीन मुर्त्या व काही वेगवेगळ्या मुर्त्याचे आज अवषेश आढळुन आले.

(Chaitanya Kanifnatha’s temple restoration excavations uncovered ancient idols and relics)

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सुमारे ८०० वर्षापुर्वीचे कानिफनाथाचे मंदिर होते. या ठिकाणी कानिफनाथ वास्तव्यास होते अशी नोंद पुरातन आढळुन येते. गुरुच्या आज्ञेनुसार कानिफनाथांनी श्रीक्षेत्र मढी येथे समाधी घेतली होती. या प्राचीन मंदिराची अतिशय पडझड होवुन दुरावस्था झाली होती. मागील महिन्यात ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या मागणीवरुन या मंदिराचे जिर्णोद्धार करुन येथे कानिफनाथांचे भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. यास सुमारे ६ कोटी रुपये अंदाजे खर्च करण्याचे ठरले होते. त्यानुसार चैतन्य श्री कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरु असलेल्या खोदकामा दरम्यान अनेक देव-देवतांच्या प्राचीन मुर्त्यांचे अवशेष आढळून आले असून या अवशेषावरून असे दिसून येते की याठिकाणी हजारो वर्षांपूर्वी एखादे मंदिर किंवा वास्तू असावी या ठिकाणी अजून काही उत्खनन झाल्यास अजून काही अनपेक्षित प्राचीन अवशेष मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. सुमारे ८०० वर्षापुर्वीच्या घडविलेल्या दगडी मुर्त्या व त्यांचे अवषेश आजही तशाच असल्याचे दिसुन येते.

 

Related Posts
1 of 2,181

चैतन्य कानिफनाथांच्या सुमारे ८०० वर्षापुर्वीचे मंदिर पाडुन त्याच्या जिर्णोद्धाराचे खोदकाम सुरु असताना प्राचीन मुर्त्या व त्याचे अवषेश सापडल्याने या ठिकाणी पुर्वी भव्य मंदिर असल्याची जाणवते-ह.भ.प.बबन महाराज नरसाळे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: