चुकीच्या व्यक्तीला मिळाला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार , विरेंद्र सेहवागचा पंचांना टोला !

सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे . क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे नेहमीच अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना,विजयासाठी झालेली धावपळ ,उत्कंठा वाढवणाऱ्या रन्स पाहायला मिळतात . हेच सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं आयपीएलच्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात .दिल्लीने सुपरओव्हरमध्ये पंजाब ला १५८ धावांचं आव्हान दिल आणि हा सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. त्यामुळे दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना सुपरओव्हरवर ठरला.
सुपरओव्हर मध्ये या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवला आणि मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग या निर्णयावर सहमत नव्हता असे दिसून आले , कारण विरेंद्र सेहवाग ने ट्विट करत टोला मारला आहे की सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा होता.
सेहवागने जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याचा फोटो शेयर करत लिहले आहे कि – मला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मान्य नाही. पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता, आणि याच एका धावेचा फरक पुन्हा पडला,” असं ट्विट सेहवागने केलं आहे.