चीनला मात देण्यासाठी भारत म्यानमारला देणार हा प्रस्ताव

0 47

नवी दिल्ली- चीन म्यानमार सोबत ऊर्जा सहकार्य संबंध बळकट करत असताना भारतही रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणूनच या दृष्टीने भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा म्यानमार दौरा महत्त्वाचा आहे.
या दौऱ्यात भारत आणि म्यानमारमध्ये पेट्रोलियम रिफायनरी उभारण्यासंबंधात चर्चा झाली. म्यानमारमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पेट्रोलियम रिफायनरीत सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल. यंगून जवळ थानलिन भागात भारताने पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

म्यानमारच्या ऊर्जा क्षेत्रात एकटया चीनची ७० टक्के परकीय गुंतवणूक आहे. हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या आँग सॅन स्यू की आणि डिफेंस सर्व्हीसचे कमांडर इन चीफ जनरल मिन आँग यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांमध्ये सीमा भागात सुरक्षा आणि स्थिरता कायम ठेवण्याबद्दल चर्चा झाली. आपल्या भूमीचा परस्पराविरुद्ध वापर करु द्यायचा नाही, असे सुद्धा या बैठकीत ठरले. बंडखोरी करुन म्यानमारमध्ये आश्रय घेणाऱ्या २२ बंडखोरांना पुन्हा भारताकडे सोपवण्याच्या म्यानमारच्या निर्णयाचे भारताने कौतुक केले.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: