चित्र वाघ यांच्या ‘त्या’ ट्विटचे काँग्रेसने केले कौतुक !

0 16

हाथरस बलात्कार व खून प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेशातील पोलिसांनी गैरवर्तन केले. या प्रकरणावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील या प्रकरणाचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले – एका महिला नेत्याच्या कपड्यांना हात लावायची हिंमतच पोलिसांनी कशी केली? ही बाब केवळ राजकारणातील महिला नेत्यापुरती मर्यादित नाही. कुठलीही महिला असेल, पोलिसांनी अशा पद्धतीने आपली मर्यादा ओलांडता कामा नये ! दरम्यान या ट्विटनंतर काँग्रेस ने चित्रा वाघ यांचं कौतुक केलं आहे.

Related Posts
1 of 257

काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कौतुक करत म्हटले आहे – चित्राताई, आपण एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून घेतलेली भूमिका स्वागतार्ह्य आहे. मात्र आपलं बोलणं निर्लज्ज योगीनाथ ऐकतील का ? हा प्रश्न मात्र आहेच ! पण एक मात्र खरं, पक्ष बदला असला तरीही तुम्ही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत ह्याचा अभिमान आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: