चार जणांची चाकूने भोसकून निघृण हत्या


अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे वर गुरुवारी साडेचार वाजण्याच्या सुमारासकरण्यात आली. या हत्येबाबत पोलिस यंत्रणेला महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून हे हत्याकांड ड्राफ्ट प्रकरण असून हत्येपाठीमागे ‘जळगाव कनेक्शन’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, नगर जिल्ह्यातील विसापूर फाटा येथे गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार जणांची चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येचे कारण आणि हल्लेखोर यांच्या बाबत पोलिसना धागेदोरे लागले आहेत. या मध्ये हे हत्याकांड ड्राफ्ट प्रकरण असून हत्येपाठीमागे ‘जळगाव कनेक्शन’ असल्याचे समजते. या हत्याकांड नातीक कुंज्या चव्हाण (वय ४०), श्रीधर कुंज्या चव्हाण (वय ३२), नागेश कुंज्या चव्हाण (वय २०), रा. सुरेगाव व लिंब्या हबऱ्या काळे (वय २२) रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर अशी हत्याझालेल्या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेणे असून बेळवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल झालाय,तर या हत्याझालेल्या तरुणांना न्याय मिळावा, त्यांना मद्दत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबातील सौरक्षण मिळावे अशी मागणी सामाजिक संघटना करताय,