घोडेगाव कॅनालचे अस्तिरीकरण केल्यास तीन गावातील पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल प्रा. श्याम बारस्कर यांची आ. रोहीत पवार यांच्याकडे मागणी

0 28

जामखेड – घोडेगाव तलावाचा असलेला कॅनाल मातीचा असल्याने वाघा, महारूळी व गुरेवाडी या गावातील ५०० हेक्टर क्षेत्र शेतीला मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहिले आहे या तलावाचे अस्तिरीकरण करावे व तलावाचे ओव्हरफ्लो पाणी अडवण्यासाठी केटीवेअर पाझरतलावसाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत.

आ. रोहीत पवार यांच्याकडे तीन गावातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मागणी करणार असल्याचे पाण्यापासून वंचीत शेतकरी प्रा. श्याम बारस्कर यांनी केले आहे. मागील पावसाळ्यात १५ ते २० मशिनरी द्वारे खोदकाम करून महारूळी तलावात पाणी सोडले होते त्यामुळे या गावातील तलाव प्रथमच भरला होता असे प्रा. श्याम बारस्कर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

तालुक्यातील घोडेगाव तलाव हा काहुरी नदीच्या पाण्यावर १९७३ साली बांधला असून १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. या तलावाच्या पाण्यावर चार गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे तसेच घोडेगाव परिसरातील तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. या तलावातून एक कॅनाल आठ कि. मी लांबीचा असून तो आजतागायत कच्चा असून खोदकाम करून केलेला आहे. या कॅनालमधून रब्बीचे दोन आवर्तन दिले जातात त्याचा लाभ वाघा, महारूळी व गुरेवाडी या गावातील शेतीला पाणी देण्यासाठी केला जातो.

याबाबत बोलताना प्रा. श्याम बारस्कर म्हणाले, कॅनाल नादुरुस्त असल्यामुळे शेवटपर्यंत (टेल टु हेड) पाणी जात नाही व तो सातत्याने फुटतो कॅनालच्या शेजारी असलेल्या शेतजमीनीत पाणी जाऊन शेतीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्या शेतात पिके घेणे शक्य होत नाही. शेत नापीक होत असल्या मुळे सदरील शेतकरी आवर्तन सोडण्यास विरोध करतात व अधिकारी आवर्तन सोडण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे सदर कॅनालचे अस्तिरीकरण झाल्यास पाणी आवर्तन वेळेवर सुटेल व शेतकरी पाण्यासाठी संमदीत खात्याकडे मागणी करू शकेल व
शेतकरी पाण्यापासून वंचीत राहणार नाहीत.

Related Posts
1 of 1,290

तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वाहून जाणारे ओव्हरफ्लोचे पाणी तालुक्यातील विविध ठिकाणी अडवण्यासाठी कोल्हापूर बंधारे, पाझर तलाव होणे आवश्यक आहे यासाठी शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार आहेत सध्या हे पाणी थेट मराठवाडय़ात जाते. या परिसरात नदी नसल्याने व पाणी येण्याचा दुसरा सोर्स नाही त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी कॅनालने सोडल्यास गुरेवाडी, महारूळी, पोतेवाडी, चोभेवाडी, उरे वस्ती या ठिकाणी शेतीला पाणी मिळू शकते असे प्रा. श्याम बारस्कर म्हणाले.

प्रा. श्याम बारस्कर यांनी आठवण म्हणून मागील पावसाळ्यात आ. रोहीत पवार यांनी ओव्हरफ्लोचे पाणी महारूळी, गुरेवाडी, ऊरेवस्ती या गावांना पाणी मिळावे यासाठी १५ ते २० जेसीबी व पोकलॅनद्वारे १० कि. मी पर्यंत कालवा खोदून काढून महारूळी तलावात पाणी सोडले त्यामुळे या गावातील तलाव प्रथमच भरला होता व शेतकऱ्यांनी जल्लोष केला याचा फायदा शेतीला झाला. हक्काचे पाणी चार गावांना मिळाल्यास रोजगारासाठी गावातील तरूण शहरात जाणार नाहीत. शेतीबरोबरच इतर व्यवसाय व उद्योग ग्रामीण भागात वाढीस लागतील.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: