घुबड पक्षाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक

0 26

जामखेड – दुर्मिळ व संरक्षित जातीचे घुबडाची वाहतूक करताना उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम व परांडा तालुक्यातील सहा इसमांना जामखेड पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले. वनविभागाने वन्य पक्षी तस्करी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, शहरातील मिलिंदनगर शेजारी असलेल्या नागेश विद्यालयाच्या मोकळ्या जागेत सहा इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत अशी माहिती मिळाली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पो. कॉ. संदीप आजबे, शेषराव म्हस्के, आबासाहेब अवारे, सचिन राठोड, संग्राम जाधव, अरूण पवार, अविनाश ढेरे यांच्या पथकाने त्या परीसरात छापा टाकून आरोपी हरी नेमीणाथ काळे, रा. सामानगाव ता. भुम, लखन उर्फ लक्ष्मण सतिष भोसले रा. भवन वाडी ता. भुम राहुल निवृत्त पवार व गणेश निवृत्ती पवार दोघे. रा. काशिमबाग. ता. परांडा, दिपक राजाभाऊ गायकवाड रा. सिध्देश्वर नगर, बीड, ज्ञानेश्वर निवृत्ती पवार रा.परांडा जिल्हा उस्मानाबाद या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली आसता त्यांच्या कडे एक पांढर्‍या रंगाच्या पीशवीत बेकायदेशीर रीत्या घुबड जातीचा पक्षी तस्करी च्या उद्देशाने वाहतुक करताना अढळुन आला. यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत आसल्याने पुढील कारवाई वनविभाग करणार आसल्याची माहिती जामखेड पोलिसांनी दिली.
वनविभागाचे कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार, वनरक्षक अनिल खराडे, तायर सय्यद, अशोक पवार, विठ्ठल जायभाय, अनिल जाधव, विजय मुरूमकर यांच्या पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Related Posts
1 of 1,301
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: