घराघरांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा विचार पेरणार -संतोष भोसले

0 26
 श्रीगोंदा  –  ग्रामीण विकास केंद्रजामखेड व कोरो मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुमताज शेख आणि  सुजाता लवांडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा येथे सावित्री महिला समस्या निवारण केंद्र  चालू असून एकूण आठ  गावातील महिलांच्या हक्क व अधिकार आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गेल्या सहा वर्षापासून चालू आहे.ग्रामीण विकास केंद्र व कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी करून सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोचवण्याचे काम येथील स्थानिक कार्यकर्ते करत आहेत.
आता सावित्रीच्या लेकी महिलांच्या हक्क व  अधिकारासाठी सरसावल्या असून छाया भोसले, मनीषा काळे, उज्वला मदने, बनकर सुनिता, पल्लवी शेलार ,लता सावंत ,भोसले ज्योती, राऊत रोहिणी,  या सावित्रीच्या लेकी तर अॅड.डाॅ.अरुण जाधव, बापू ओहोळ,सचिन भिंगारदिवे ,सागर भांगरे,केसकर वैजिनाथ,संतोष चव्हाण व संतोष भोसले हे ही  श्रीगोंदा तालुक्यातील महिलांच्या  हक्क व अधिकारासाठी सतत कार्यरत आहेत .
Related Posts
1 of 1,291
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या गावातील पार्वत वाडी येथे पहिल्यांदाच सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली असे प्रतिपादन  डॉक्टर शेलार यांनी केले तर  सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोहोचवणार असे संस्थेच्या वतीने जयंती साजरी करताना संतोष भोसले व छाया भोसले म्हणाले आणि सावित्रीबाई यांच्या अथक प्रयत्नामुळे व त्यांनी सोसलेल्या कष्टामुळेच मला शिक्षण घेता आले असे  शोभा शेलार म्हणाल्या .

हे पण पहा – स्टॅंडिंग म्हणजे काय? बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंटसाठी न्यायालयात 

अशी माहिती ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे तालुका समन्वयक व लोकअधिकार  आंदोलनाचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली असून या जयंतीसाठी शेलार  शोभा ,कमल खेत्रे ,पुष्पा शेलार, मंगल तोडकर ,चांगुना साबळे, लताबाई अवताडे, मनीषा साबळे, ताराबाई आढाव ,वैशाली अवताडे, ताई आढागळे, अंकुश शेंडगे, बारकू आढाव उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: