ग्रामीणभागात अद्ययावत कोरोना उपचार केंद्र


अहमदनगर (श्रीरामपूर ) : नुकतीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली . यामध्ये आ लहू कानडे यांनी मांडलेल्या तालुका ठिकाणी ऑक्सिजन आणो व्हेंटिलेटर सुविधा असावी , त्याचबरोबर शासनाकडून पुरविण्यात येणारे उच्च दर्जाचे औषधे इंजेक्शन पाहिजे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली . आ लहू कानडे यांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स आणि इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध केलेला असून आठवडाभरात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे