ग्रामिण भागात नेत्र शिबिरांची अत्यंत गरज – अँड. कमल सावंत

0 27
श्रीगोंदा – डोळ्यांचे महत्व द्रुष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते , द्रुष्टी असेल तरच स्रूष्टी आहे. द्रुष्टीहिनांना ही द्रुष्टी दाखवण्यासाठी ग्रामिण भागात शिवनेरी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व अल्प दरातील मोतीबिंदू शिबिराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद  असून कोरेगव्हाण सारख्या ग्रामिण भागात या नेत्र तपासणी शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदे च्या मा. सभापती अँड. कमल सावंत यांनी केले.
  आनंद ऋषिजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशन अहमदनगर आणि शिवनेरी प्रतिष्ठान कोरेगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे रविवार , दिनांक 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अँड. कमल सावंत बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर , मा. पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे , उद्योजक अतुल लोखंडे , फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे , आनंद ऋषिजी नेत्रालय अहमदनगर चे डॉ. संजय शिंदे , आर्यन कराळे, किरण कवडे , सहाय्यक स्वप्नील गव्हाणे , कोरेगव्हाण चे मा. सरपंच संतोष नरोडे , मा. सरपंच संपत इधाटे , मा. सरपंच महादेव नरोडे , मा. सरपंच गणेश आढाव , क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक अप्पा आढाव , सामाजिक कार्यकर्ते रामदास लोंढे , विसापूर चे सरपंच अरविंद जठार , सारोळा सोमवंशी चे मा. उप सरपंच दत्तात्रय नवले , युवा उद्योजक राहुल आढाव , माहिती आधिकार कार्यकर्ता समिती चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ नवले व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब नवले , भारतीय जनता पार्टी चे प्रवीण मापारे , तंटामुक्त समिती चे जगन्नाथ कातोरे , गोरक्ष बारगुजे , कोंडेगव्हाणच्या मा. सरपंच बेबीताई मगर , निंबवी च्या मा. सरपंच सुरेखा शिर्के , कोरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमजान सय्यद , कवी संदीप बोरगे , सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गोंटे , सुदाम आढाव व शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव आदी उपस्थित होते.
Related Posts
1 of 1,301
प्रास्ताविकात शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव यांनी समाजातील गोरगरीब , शेतकरी , कष्टकरी , मजूर महिलांसह आर्थिक दुर्बल घटकातील द्रुष्टी दोष असलेल्यांसाठी शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने हॆ शिबिर घेतले जात असून या भागातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोरेगव्हाण गावातील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर पंचे चाळीस रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरासाठी कोरेगव्हाण , सारोळा सोमवंशी , निंबवी , कडूस , हिंगणी , कोंडेगव्हाण , विसापूर , पाडळी , पिंपळगाव पिसा , चांभुर्डि , सुरेगाव , मुंगुसगाव आदी गावातील नागरिकांसह महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते देवराम उदार यांनी केले. आभार युवा नेते ईश्वर आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेगव्हाण मा. उपसरपंच निजाम सय्यद , युवा उद्योजक शरद नरोडे , मच्छिंद्र गोंटे , सोपाना आढाव गुरुजी , युवा नेते विजय आढाव , कोरेगव्हाण सोसायटी अध्यक्ष रामदास ईधाटे ,  संतोष गोंटे , नंदकुमार गोंटे , गणेश ईधाटे , संतोष आढाव , अशोक विटेकर व शिवनेरी प्रतिष्ठान च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: