ग्रामपंचायत निवडणूक –  १४ गावात विखे विरुद्ध थोरात यांच्यात थेट लढत  

0 28

अहमदनगर –  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केल्या नंतर अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार , खासदार तसेच माजी आमदारांनी प्रयत्न केले. आमदारांनी गावाच्या विकासासाठी बक्षीस सुध्दा जाहीर केली होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना हवे इतका यश प्राप्त झाला नाही .  या मुळे आता संगमनेर तालुक्यात परत एखदा थोरात आणि विखे यांच्यात थेट लढत पहिला मिळणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या संगमनेर तालुक्यातील २६ गावापैकी १४ गावात विखे विरुद्ध थोरात यांच्यात थेट लढत होणार आहे. यामुळे दोन्ही मध्ये असणारा  संघर्ष परत एखदा जिल्हातील नागरिकांना पहिला मिळणार आहे. संगमेर तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायती पैकी फक्त चार ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहे. यामुळे ९० ग्रामपंचातीमध्ये येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. आणि यांच्या निकाल १८ जानेवारीला लागणार आहे.

             नगरसह पुणे जिल्ह्यात ११ जानेवारीपासून सुरू होणार महाविद्यालय

Related Posts
1 of 1,321
 तर दुसरी कडे कोपरगाव तालुक्यात एकही ग्रामपंचात निवडणूक बिनविरोध न झाल्याने तिथे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात थेट लढत आहे.
कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  काकडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे ११ अर्ज आहेत, तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचेही प्रत्येकी ११  अर्ज दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त काही अपक्ष  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

        हे पण पहा – बाळ बोठे घेतोय गुन्ह्यातून सुटण्यासाठी तांत्रिकाची मदत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: