गॅंगस्टर अबू सालेम चे नाव घेऊन खंडणी साठी महेश मांजरेकर यांना धमकी


मुंबई- दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांना ३५ कोटी रुपयांची खंडणी साठी फोन वरून गॅंगस्टर अबू सालेम चे नाव घेऊन धमकी देण्यात आली होती.
सलग दोन दिवस फोन आल्याने महेश मांजरेकर याने दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
आरोपी ने यू ट्यूब वरून अबू सालेमची महिती घेतली आणि माय नेता या अॅप वरून महेश मांजरेकर चे नंबर घेउन त्यांना कॉल केली. खंडणी विरूद्ध पथकाने आरोपी मिलिंद बाळकृष्ण याला रत्नागरीतून अटक केली आहे.