गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात ; बाईकस्वार जखमी !

0 166

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या गाडीला अपघात झाला आहे .पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ ही घटना घडली आहे .या अपघातामध्ये १ वैदकीय कर्मचारी झाला आहे . बी.सी. पवार असे जखमी झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्याचे नाव आहे .

Related Posts
1 of 2,084

गिरीश महाजन यांची गाडी लोहारी-वरखेडीतून जात होती , त्यावेळी संबंधित वैद्यकीय कर्मचारी दुचाकीवरुन समोरुन येत होता. त्या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीस महाजनांच्या गाडीने धडक दिली आणि अपघात घडला. दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला अशी माहिती आहे.अपघातानंतर महाजन यांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

दरम्यान दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे . खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे . या अपघातात जखमी झालेल्या बी.सी. पवार यांची तब्बेत चिंताजनक असल्याची माहिती आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: