गायी च्या हंबरड्याला पोलिसांकडून गुळाची ढेप


अकोला : पोलीस म्हणलं कि कडक शिस्त आणि हातात दंडुका आणि घ्यायचीच सवय इतकच आपल्याला माहिती असून हि नकारात्मक भूमिका अकोला पोलिसांनी पुसून काढली आहे . अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी नाकारात्मकतेला पुसून काहीसा सकारात्मक दृष्टिकोन उभा केलाय . कोतवाली पोलिस ठाण्यासमोर गायी येऊन हंबरडा फोडतात मग त्यांना सरकीची ढेप द्यावा लागते मग खाऊन निघून जातात आणि जर द्यायला उशीर झाला तर हंबरडा फोडतात , हा उपक्रम रोज चालू असतो. सिटी कोतवाली ठाणेदार उत्तमराव जाधव हे पहिल्यापासून शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना आधीपासून जनावरांचा लळा असल्यामुळे जनावरांना जीव लावणे त्यांना खूप आवडते . जसं इतर दारासमोर त्या उभ्या राहतात तशाच त्या पोलीस स्टेशन समोर उभ्या राहतात , तशा आमच्याही दारासमोर उभ्या राहतात , त्यांना घेणं देणं नाही कि हे पोलीस स्टेशन कि घर .