गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले- रावसाहेब दानवे

0 21

मुंबई – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी १ ऑक्टोंबर रोजी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसा कडून अडवण्यात आले होते.

याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या धक्काबुक्कीमुळे राहुल गांधी खाली पडले होते. या घटनेनंतर विरोधकांनी योगी सरकार आणि यूपी पोलिसांवर निशाणा साधला होता. परंतु राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे.

दानवे म्हणाले  मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या गर्दीत चालायची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच मागील सहा वर्षांपासून देशात भाजपाचे सरकार आहे.

Related Posts
1 of 1,357

सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करुन गोरं होतं का, हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, अशी खोचक टीका देखील रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस वर केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: