गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

0 23
अहमदनगर –  गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालासह  स्थानिक गुन्हे शाखेने जेर बंद केले आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी कि दिनांक २३ नोव्हेंबर २०२० रोजी फिर्यादी स्वप्निल नंदकिशोर सोनार, वय ३२, रा. रेणुकानगर, ता. राहाता, जिल्हा अहमदनगर हे राहाता बाजारामध्ये आले असता कोणीतरी अज्ञात गुन्हेगाराने गर्दीचा फायदा घेवुन, त्यांचा १८०००/- रु. किंमतीचा सॅमसंग कंपनीचा A ५१ मॉडेलचा मोबाईल हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेला होता, या बाबत फिर्यादी यांनी राहाता पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ६९२/२०२० भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर पोनि श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे व त्यांचे पथकाती अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असतांना, पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मोबिन शेख, रा. राहाता याने केला . असल्याची खात्रिशिर माहिती मिळाल्याने पथकातील पोना/विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे,
रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/रविंद्र चुंगासे, रोहिदास नवगिरे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी राहाता येथे जावुन आरोपींचे वास्तव्या बाबत माहिती काढुन आरोपी नामे मोबिन फारुख शेख, वय २८, रा. राहाता, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन गुन्हयातील १८०००/- रु. किंमतीचा सॅमसंग A ५१ मॉडेलचा मोबाईल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.
Related Posts
1 of 1,292

पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. संजय सातव, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: