खुश खबर जिल्यात एवढे रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज 

0 70

अहमदनगर: जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४४४ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५५, संगमनेर ०१, राहता ०३,  पाथर्डी २१,, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट ०९,  नेवासा ०३, पारनेर ०५, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०१,  जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Related Posts
1 of 2,057

दरम्यान, आज ९०९ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३२२, संगमनेर ७१, राहाता ५९, पाथर्डी २१, नगर ग्रा.९५, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट १३,  नेवासा ५५, श्रीगोंदा ३२, पारनेर २०, अकोले ३७, राहुरी ४३, शेवगाव १४,  कोपरगाव २६, जामखेड १७, कर्जत १३, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २४१५०  उपचार सुरू असलेले रूग्ण:३४४४   मृत्यू:४१६ 
एकूण रूग्ण संख्या:२८०१०  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: