खर्डा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान जनजागृतीमुळे अँटिजेन टेस्ट वाढल्या

0 19

जामखेड – खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि परिसरात वाहनावर ध्वनीमुद्रण करून जनजागृती करण्यात आली. तसेच आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून छोटे मोठे व्यावसायिक तसेच नागरिकांची तपासणी करण्यात आली. रॅपिड अँटिजेन टेस्ट दोन दिवसात १५० करण्यात आले त्यापैकी १६ बाधीत आढळले.
खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी याअभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र हंगे म्हणाले की, आ. रोहीत पवार यांच्या माध्यमातून खर्डा येथे रॅपिड अँटिजेन टेस्टला मान्यता मिळाली आहे त्यामुळे ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, थकवा आदी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ खर्डा आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट तपासणी करुन घ्यावी त्यामुळे आपण आपल्या परिवाराची व समाजाची काळजी घेऊन कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करू शकू असे डॉ. हंगे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते महालिंग कोरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, संतोष थोरात, संजय गोपाळघरे, डॉ. अनिल बिरंगळ, कार्यालयीन अधीक्षक डॉ. क्रांती घोळवे, डॉक्टर त्रिशाला विधाते, डॉ. सीमा पोळ ,डॉ. सोनाली गोरे ,डॉ.स्वप्नील कुलकर्णी, डॉ. स्वप्नील गोरमाली, डॉ. हरिभाऊ काळे, डॉ.शुभम आडसूळ उपस्थित होते. आरोग्य सेवक अशोक खाडे, अभिमन्यू सोनटक्के, बाबासाहेब डोके, आरोग्यसेविका मंगल जोरे, हिराबाई गायकवाड, आशा गटप्रवर्तक मंगल शिंगाणे, आदी आरोग्य दूतांच्या पथकाने खर्डा शहरात शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील हॉटेल, भेळची दुकाने, फळ विक्रेते, पान सेंटर, केश कर्तनालय, मोबाईल शॉपी आदी विविध व्यवसायिकांसह खर्डा आणि परिसरातील नागरिकांना दुकानात जाऊन जनतेशी संपर्क असणाऱ्या विविध व्यवसायिक व नागरीक यांची ताप व आँक्सीजन तपासणी करण्यात आली तसेच तपासणीत आढळलेल्या संशयित व कोवीड टेस्ट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलून टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये १५० पैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Related Posts
1 of 1,359
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: