खडसेंच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांणा उधाण आलं आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील ही प्रतिक्रिया दिली.