DNA मराठी

खंडणीस नकार दिल्याचा राग आल्याने गावठी कट्टयाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

0 155

अहमदनगर  –  २८ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ०७:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी योगेश बाळासाहेब कुसळकर याने फिर्यादी भारत आसाराम जाधव हा त्याच्या साईश्रध्दा मोबाईल शॉपी, पाईपलाईन रोड येथे असताना तेथे येवुन फिर्यादीस आरोपीताने त्याच्या बहिणीसोबत फिर्यादी यांचे असलेले पती-पत्नीचे संबंध कायम करा आणि  मला ४ लाख रूपये द्या अशी खंडणीची मागणी केली असता फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.

त्याचा आरोपीस राग आल्याने आरोपीने त्याच्याजवळील सॅक मधुन गावठी कट्टा काढुन त्या गावठी कट्टयातुन फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर तसेच उजव्या पायाच्या आतील घोटयावर व बाहेरील घोटयाखाली गोळया झाडुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जबर दुखापत केली म्हणुन फिर्यादी भारत आसाराम जाधव यांनी  २९एप्रिल २०१७ रोजी  तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर येथे आरोपीविरूध्द भा. द.वि.कलम ३०७, ३८४ सह आर्मस ऍक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदरचा खटला सुरूवातील मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश क.१ श्री.एस.आर.जगताप साहेब व त्यानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ८ श्री. एम.आर.नातु साहेब यांचे न्यायालयात चालला. 

Related Posts
1 of 2,489

सरकार पक्षाच्या वतीने एकुण ०७ साक्षीदार तपासण्यात आले. मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी वकील श्री. सी.डी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा.न्यायालयाने आरोपीस दोषी धरले व त्यास भा.द.वि.का.कलम ३०७ व ३८४ अन्वये दोषी धरून कलम ३०७ प्रमाणे ५ वर्ष सक्तमजुरी व ५००/-रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरी आणि कलम ३८४ प्रमाणे १ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान तोफखान पोलीस स्टेशनचे पो.कॉ.श्री.काळे यांनी सहाय्यक सरकारी वकील श्री.सी.डी.कुलकर्णी यांना सहाय्य केले.
     

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: