क्लोज मटका पुन्हा ओपन’ तर देशी दारूचाही महापूर ,मात्र पोलिसांचा दुर्लक्ष

0 36

अहमदनगर – श्रीगोंदा पोलिस आणि राज्य उत्पादन कार्यालयाच्या ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्षामुळे शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्यांना उत आला असुन काल पर्यंत क्लोज झालेला मटका-जुगार आता लपुन छपुनच परंतु सर्वत्र सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे पोलिस दलातर्फे अवैध धंद्याविरोधात कारवाईची धडक मोहिम सुरु असल्याची बतावणी करीत असल्याची दाखवुन अवैध धंद्यांची मोठी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसापासुन श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी – विदेशी दारु विक्री जोरात सुरु असुन याकडे मात्र श्रीगोंदा पोलिस तथा राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाकडुन ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 हे पण पहा – लंके यांचा बिनविरोध षटकार आणखी तीन ग्रामपंचायतींची घोषणा

तालुक्याच्या सर्वच गावांचा दैनंदिन संबंध असतो. शिवाय नामांकित शिक्षण संस्थामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थींनींचा येथे रोजच ये-जा करावे लागते.याचा त्रास विध्यार्थी वर्गालाही सहन करावा लागत आहे  मात्र काही दिवासपासुन शहरात अवैध धंद्याचा उत आला असुन अनेक ठिकाणी शासनाने बंदी घातलेला गुटका, मटका,जुगार, देशी दारु विक्री जोमात सुरु असल्याने क्लोज मटका व गुटक्यावरील घातलेली बंदी कधी ओपन केली गेली असा प्रश्न सामान्य नागरीकांकडुन विचारला जात आहे. परंतु कामदा आणि सुव्यवस्थेचा डांगोरा पिटणारे पोलिस यंत्रणामात्र हव्यासापोटी या गंभीर बाबीकडे डोळे झाक करीत असल्यामुळे नागरीकातुन असंतोष व्यक्त होती आहे.
Related Posts
1 of 1,290
देशी दारूचा महापुर अन् अधिका-यांचे साटेलोटे ! 
अवैध देशी दारुमुळे सामान्य नागरीकांचे जगणे मुश्कील झाले असले तरी या अवैध दारु विक्रीला वारंवार पोलिस अन् दारु बंदी अधिका-यांचीही कृपादृष्टी लाभत असल्यामुळे दिवसेंदिवस देशी दारुची विक्री वाढतच आहे. आणि तळीरामांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. देशी दारुच्या विक्रीबाबत परवाना धारक मद्य विक्रेत्यांना काही नियम आणि अटींच्या अधीन राहुनच आपला व्यवसाय चालवावा लागतो त्यांमध्ये तृटी किंवा अनियमितता दिसुन आल्यास दारुबंदी विभाग कारवाईचा बडघा ऊगारला जाऊ शकतो. परंतु शहरातील परवानाधारक मद्य विक्रेतांना दारुबंदी खात्याची भलतीच मेहरबानी दाखविली जात असावी अशी शंका वाटते. कारण मद्य विक्री बाबतच्या अटी आणि शर्ती खुटींवर टांगुन त्यांनी आपला व्यवसाय भरभराटीला आणला असल्याचे दिसुन येत आहे. दारु बंदी अधिका-यांची कृपा आणि स्थानिक पोलिसांचे आर्शिवाद असल्यामुळे त्यांना दारु विक्रीसाठी मोकळे राण मिळाले असुन शहरात दररोज पहाटे ग्रामीण भागातुन जेव्हडे दुध पुरवठा होत नसेल त्यापेक्षा अधिक पटीने शहरातुन गावावागात अवैध दारु वाहनाद्वारे पुरवठा होत आहे. चुकून कधी पोलिसांकडुन अवैध मार्गाने देशी दारुची वाहतुक करणा-या वाहन चालकांवर जुजबी कारवाई करुन नंतर सोडुन दिले जाते. मात्र देशी दारुचा जप्त केलेला माल ज्या मद्य विक्रेत्याचा असतो त्याने मात्र अधिक पोलिसांना व दारु बंदी अधिका-यांना मॅनेज केलेले असल्यामुळे कारवाई पासुन नामानिराळेच राहतो.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: