DNA मराठी

क्रिकेट : कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा होणार रद्द

0 80
Related Posts
1 of 2,489

कोरोना’मुळे आता भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा आता धोक्यात आला आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये सुरु होणार होता. पण ऑस्ट्रेलियाने आता सहा महिने आपल्या सीमा बंद करायचे ठरवले आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा आता रद्द होणार असल्याचे सांगितले जात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चांगला सराव व्हावा, यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचे ठरवले होते. आतापर्यंत कोरोना’मुळे बीसीसीआयला बरेच दौरे रद्द करावे लागले आहेत. मागील महिन्यात भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आला होता. दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसांच्या सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर ‘कोरोना’मुळे ही मालिकाच बीसीसीआयला रद्द करावी लागली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: