DNA मराठी

क्रांतिदिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न

0 83
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : उद्या ९ ऑगस्ट जागतिक क्रांती दिन. क्रांतिदिनानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात . नगरमधील भगतसिंग उद्यान , पत्रकार चौक येथेही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जागतिक क्रांती दिन आज साजरा केला . यावेळी वृक्षारोपण करण्यात आले, अनेक कार्यकर्त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या , जीवावरती खेळून भारतमातेला मिळवून दिलेलं स्वातंत्र्य कशाप्रकारे मिळाल यावरही भाषणे झाली . भारतमाता कि जय च्या घोषणा देण्यात आल्या . याप्रसंगी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भोरे, राजेंद्र मालू , किशोर कुलकर्णी , संजय खोंडे , ऋषिकेश शिंदे , सुमित कुसाळकर , राजू काळे , संगीत मोरे उपस्थित होते 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: