DNA मराठी

कोल्हार येथे मोटार सायकल आणि पिकअपचा अपघात

0 265

अकोले – कोल्हार घोटी रस्त्यावर आपल्या मोटार सायकलवरून राजूरकडे येत असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांना अक्षरश उडविले त्यात एकाच जागीच मृत्यू तर एक जण गंभीररीत्या जखमी असून त्याला संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे .
मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी नातेवाईकांवर दबाव आणला जात असल्याचे समजते तर वाहनचालक कोण याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे .

फिर्यादी महादू मंगा करवर याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बाभूळवंडी तालुका अकोले येथील पोलीस पाटील धोंडिबा मंगा करवर (वय ५५ )आणि ढवळा बहिरू लेंडे वय( ४५ )हे दोघे आपली मोटार सायकल एम एच ०४ सीएक्स ६१०७ घेऊन राजूरकडे येत असताना पिकअप गाडी एम एच ०४डीएस ९६६१ घेऊन विरुद्ध दिशेने रस्त्याकडे दुर्लक्ष्य करून भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला उडवून दिले त्यात पोलीस पाटील धोंडिबा मंगा करवर याचा जागीच मृत्यू झाला तर मागील सीटवर बसलेला ढवळा बहिरू लेंडे यास गंभीर दुखापत झाली असून मृत्यूस जखमीस कारणीभूत ठरल्याने राजूर पोलिसांनी आरोपीविरोधात भा. द. वि. कलम ३०४(अ ), २७९,३३७ , ३३८ ,४२७मोटारवाहन कायदा कलाम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून स .पो. नि. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ . कैलास शेळके तपास करीत आहे मात्र घटना सोमवारी घडूनही बुधवारी सकाळपासून पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली तर एका राजकीय नेत्याचा पोलिसांना फोन झाल्याची चर्चा ,हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Posts
1 of 2,488

हा मृत व्यक्ती पोलीस पाटील होता मात्र सोमवारी घटना घडूनही या प्रकरणाचा तपास बुधवार पर्यंत सुरूच होता तर पोलीस स्टेशन बाहेर तडजोडीसाठी मोठी गर्दी करण्यात आली होती शिवाय अशी गंभीर घटना घडूनही वरिष अधिकारी याकडे फिरकले नाही तर पोलीस खात्याशी संबंधित असलेला व्यक्तीचं म्हणजे पोलीस पाटलाचा मृत्यू होऊनही काहीच कारवाई होत नाही तर पुढारी देखील हस्तक्षेप करीत असल्याने हे कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवाय याबाबत घटनेत बदल केला असला तरी सीसीटिव्ही फुटेज हा मोठा पुरावा आहे .याची चौकशी होण्याची मागणी होऊ लागली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: