कोल्हापुरात चाहत्याला शेतात नेऊन चोप


कोल्हापूर: इंडियन प्रीमिअर लीग IPL स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता भारतातील क्रिकेट फिव्हर चांगलाच वाढताना दिसत आहे. एरवी आयपीएल स्पर्धेच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळते. मात्र, कोल्हापुरात हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या महेंद्रसिंह धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा वाद रंगला आहे. याच वादातून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे धोनीच्या एका चाहत्याला शेतात नेऊन बडवल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी या घटनेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.