कोर्टामध्ये कंगनाने केलेल्या दाव्याची झाली पोलखोल

0 30

मुंबई- कंगना रनौत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील वाद आता मुंबई हायकोर्टात आहे. कंगनाने शिवसेनेविरोधात आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं मुद्दामून माझ्या ऑफिसवर बुल्डोझर फिरवला असं कंगनाचं म्हणणं आहे.

दरम्यान आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या दाव्यांची मुंबई हायकोर्टात पोलखोल केलीये.कारवाई झाली तेंव्हा तिथे वॉटरप्रूफिंगचं काम सुरु होतं.बेकायदेशीर बांधकाम आधीपासून उभं होतं.काम सुरु असताना कारवाई केली हा आरोप चुकीचा आहे .कंगनाची राजकीय वक्तव्यानंतर कारवाई झाली हा दावाच करता येणार नाही.

मीडियाच्या माध्यमातून कॉंट्रोव्हर्सी केली जातेय, त्याचा आणि बेकायदा बांधकाम तोडकामाचा काहीही संबंध नाहीकंगनाने बेकायदा बांधकाम कधी आणि कसं केलंय याचा तपशील याचिकेत नाही असे स्पष्टीकरण मुंबई महानगपालिकेने मुंबई हायकोर्टात दिले.

Related Posts
1 of 1,420

बृहन्मुंबई महापालिकेने कंगनाच्या ऑफिसवर बुल्डोजर चालवण्याच्या बऱ्याच आधी कंगनाने तिच्या ऑफिसमध्ये अनेक बेकायदेशीर बदल केले होते. मुंबई महानगपालिकेने मुंबई हायकोर्टात याबाबत स्पष्टीकरण दिलंय. कंगना रनौतने मुंबई महानगरपालिकेवर केलेल्या आरोपांपेक्षा वस्तुस्थिती पूर्णपणे भिन्न आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: