DNA मराठी

कोर्टाच्या निर्णयाचा आदर मात्र माध्यमांनी टीका करणं टाळावंं – मंत्री तनपुरे

0 91
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर – सुशांत सिंह प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे मात्र माध्यमांनी काहीही टीका टिप्पणी करणं टाळावे अशी प्रतिक्रीया महाविकास आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे,
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंहचा तपास मुंबई पोलिसांकडे न ठेवता थेट cbi कड़े दीला आहे, दरम्यान कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला कोर्टाने जोरदार धक्का दीला आहे, यावर महाराष्ट्र सरकारची पुढची भूमिका काय राहणार यावर बैठका सुरू आहे, दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली
मागील पाच वर्ष मुख्यमंत्री असतांना ज्यांनी गृहखात देखील सांभाळल आहे त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप करणं हे चुकीचं होतं,असा टोला भाजपाचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांना प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे, तसेच एखाद्याची आत्महत्या होणे हे दुःख घटना आहे मात्र त्यावर इतकी चर्चा होते की काही माध्यमं काहीही टीका टिप्पणी करतात त्यामुळे, टीव्हीवर काहीही टीका टिप्पणी करणं टाळून पोलिसांना तपास करू द्या अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: