कोरोना योद्धा डॉ. सर्जेराव मोहळकर यांचे निधन

0 30

जामखेड – नान्नज येथील कोरोना योद्धा व प्रतिष्ठीत डॉ सर्जेराव सोपानराव मोहळकर (वय ५४) यांचे पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मंगळवारी चार वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सरपंच डॉ. विद्या मोहळकर, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी नान्नज येथे समजताच नान्नज गावात हळहळ व्यक्त करून गाव बंद पाळण्यात आला. त्यांचा अंत्यविधी नान्नज येथे होणार आहे.

मागील अडिच वर्षापासून त्यांची पत्नी नान्नज गावची सरपंच म्हणून काम पाहत होत्या या काळात नान्नज गावात विकासाचे मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले.

कोरोना काळात या डॉ. दाम्पत्यांनी ग्रामस्थांची काळजी घेऊन उपायोजना केल्या तसेच घरोघरी जनजागृती करून कोरोना रूग्णांना दिलासा दिला तसेच महिला बचतगट व गोरगरिबांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पुढाकार घेतला.

Related Posts
1 of 1,290

मागील ३० वर्षापासून वैद्यकीय सेवा अल्पदरात करून नान्नज व पंचक्रोशीत नावलौकिक मिळविला. त्यांच्या निधनाने नान्नज पंचक्रोशीत व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: