DNA मराठी

कोरोना मुळे पावसाळी अधिवेशन वेळेपूर्वीच तहकूब 

0 164

नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या संसर्गा मुळे  संसदेचे  पावसाळी अधिवेशन वेळेआधीच संपवण्यात आले आहे . १४ सप्टेंबर रोजी सुरु झालेलं हे अधिवेशन १८ दिवस म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं. परंतु केवळ दहा दिवसांतच हे अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे .

मागच्या काही दिवसांत काही मंत्र्यांसह खासदारही करोना पॉझिटिव्ह आढळले होते. या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते.१४ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात अनेक विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये नुकतेच काढण्यात आलेल्या अध्यादेशांचं कायद्यात रुपांतर करण्यासाठीच्या विधेयकांचाही समावेश होता. 

Related Posts
1 of 2,489

राज्यसभेत २५ विधेयकांना मंजुरी मिळाली. तर गोंधळाच्या स्थितीमुळं विरोधीपक्षांच्या आठ सदस्यांना रविवारी शेवटच्या सत्रासाठी निलंबित करण्यात आले . लोकसभेत चांगल्या प्रकारे कामकाज पार पडलं. १० दिवसांत लोकसभेत २५ विधेयकं मंजूर झाली तर १६७ टक्के कामकाज झालं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: