कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश !

जगभरासह भारतात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होत आहे. अशातच कोरोनापासून बचाव कसा करावा यासाठी हायकोर्टाने काही आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे -कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरात फिरत आहेत ,ज्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी घरातूनच उपचार घ्यावे . यासाठी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा आणी तपासणी करणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यात यावी.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. या आदेशामुळे नक्कीच आपल्याला कोण कोरोनाबाधित आहे किंवा कोण कोरोना चाचणी करून आले आहे याची माहिती मिळेल.
सध्याची परिस्थिती पाहता जवळजवळ शहरातील प्रत्येक कुटूंबातील एका सदस्याला तरी कोरोनाची बाधा झाली आहे . त्यामुळे लक्षणे नसणाऱ्यांना जर होम क्वारंटाइन ठेवायचे असेल तर त्यांच्या हातवर स्टॅम्प लावण्यात यावा असे कोर्टाने आदेश दिले.