कोरोना टू गाव लघुपटाची निर्मिती; अकोल्यातील अकोट कला मंचचा उपक्रम

0 22

अहमदनगर – कोरोना या जागतिक आरोग्य संकटाच्या काळातील घटनेवर आधारीत ग्रामीण भागातील वास्तव मांडत सामाजात  जनजागृती तसेच शेतकरी कुंटुब व गावाचा सामाजिक संदेश देणारा कोरोना टू गाव या लघु पटाची निर्मिती अकोल्यातील अकोट कला मंचने केली आहे. नुकताच हा लघुचित्रपटाचे प्रदर्शन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे हस्ते आँनलाईन करण्यात आले. या अस्सल लघुचित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या लाईव्ह प्रदर्शन कार्यक्रमाला तीन हजाराचे वर प्रेक्षकांची उपस्थिती होती.

अकोट येथील कला मंचचे योगेश वाकोडे या युवकांने लघुचित्रपटाची  निर्मिती केली आहे. चित्रपटात बहुतांश शेतकऱ्यांचे मुलांनी अभिनय केला असुन कोणताही खर्च व उत्पन्नाचे साधन म्हणून हा लघुचित्रपट बनविण्यात आला नाही. या जनजागृती लघुचित्रपट माध्यमातून काही शेतकरी कुटुंबातील वास्तव, शेतीचे महत्व हे कोरोना या महामारी संकटात उजळुन निघाले. नोकरी व लग्नाचे चिंताजनक परिस्थिती व काही मुलीचा शेतकरी नवरा बद्दलचा दृष्टिकोन पाहता शेतीचे महत्व, कोरोना पासुन प्रत्येकांचे आरोग्य,गावाचा विकास, गावात आपुसकी, काळजी स्नेहाचे नाते, शहर व गावातील हवा,पाणी बदल रेखाटला आहे.  या लघुपटात ओघवते भाषेत संवाद बोलके आहेत. तालुक्यातील पिंप्री जैनपूर या गावात चित्रपटाचे शुटिंग व शेतकरी कुंटुब व बंहुताश गावकऱ्यांचा  समावेश आहे. समाजासाठी जनजागृती म्हणुन काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतः जवळली साधन सामुग्री वापरत योगदान दिले आहे.

 

Related Posts
1 of 1,290

बाळ बोठे विरोधात खंडणीची गुन्हा दाखल

अकोट कलामंच प्रस्तुत –

कोरोना- टु -गाव या लघुचित्रपटाचे  निर्माता  योगेश वाकोडे, दिगदर्शक विश्वास आप्पा कुरवाडे,हरिष ढवळे, कथालेखक विजय शिंदे ,सहाय्यक संदीप ढोक, आदर्श अग्रवाल,रवी पवार, परिक्षीत बोचे, अमोल नगरे,मोहन परळकर, महेंन्द्र सोनोने, विशाल तट्टे, अतुल मानकर यांनी केले तर अभिनय  गीताआई भगत, भास्कर उर्फ बाबासाहेब भगत, भोजराज भगत, विजय शिंदे, अनंता भगत, ज्ञानेश्वर पखान, प्रशांत भगत,  गौरव भगत, दीपक भगत, गोवधन बानेरकर, श्याम कोल्हे, नामदेव बानेरकर, वैभव भगत. अरविंद बानेरकर, लकी इंगळे यांनी केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: