कोरोना काळातल्या योगदानाबद्दल सन्मान

अहमदनगर : कोरोना सगळ्यांनाच सतावत असून कोरोना पॉझीटीव्ह आहे असं समजल तरी आपण किती घाबरतो पण काही समाजसेवक असे आहेत जे मनापासून या संकट काळात कोरोना रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मदत करतात . त्यापैकी १ आहेत हेलपिंग हॅन्ड्स युथ फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांचा पोलीस दलातर्फे कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . कोरोनाकाळात हेलपिंग हॅन्ड्स युथ फौंडेशनच्या वतीनं त्यांना अन्न धान्य , किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .