कोरोना इफेक्ट : ‘या’ फेमस दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ !

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या जागतिक महामारीमुळे जवळ जवळ सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले . कोरोना संकट आणि लॉकडाउन अशा परिस्थितीमध्ये घरगाडी कशी चालवावी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.अनेक जणांवर उपासमारीची वेळदेखील आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर तर सेलिब्रिटींवरही झाला असल्याचे दिसून येत आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक रामवृक्ष यांच्यावरही भाजी विकण्याची वेळ आली आहे अशी माहिती आहे. त्यांनी ‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मलिकांसाठीदेखील काम केले आहे. सध्या रामवृक्ष त्यांच्या गावी भाजी विकण्याचे काम करत आहेत.लॉकडाउनमध्ये रामवृक्ष आपल्या गावी गेले होते. सर्वकाही ठप्प असल्याने त्यांची परिस्थिती बिकट होती . कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी भाजी विकत असल्याचे रामवृक्ष यांनी सांगितले.
रामवृक्ष यांनी २५ पेक्षा जास्त काही गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. मात्र आता कोरोनामुळे त्याचे आयुष्य बदलून गेले आहे.