DNA मराठी

कोरोनामुळे महसूलला ३२१ कोटींचा  फायदा ; मद्यपींचा बेधुंद कारभार 

2 132

अहमदनगर : कोरोनामुळे नुकसान तर खूप झालाय पण तळीरामांनी मात्र सरकारचा भरपूर फायदा करून दिलाय , तो कसा ? तर मे , जून , जुलै मध्ये चक्क ६६ लाख ८८ हजार ५८१ लिटर दारूवर तळीरामांनी ताव मारलाय . दारूच्या निर्मिती आणि विक्रीमुळे सरकारला भरपूर फायदा होतो , त्यातच जिल्ह्यात दारू निर्मिती करणारे अनेक कारखाने असल्यामुळे जिल्ह्यासह देशभरात दारू निर्यात केली जाते आणि महसुलला मुबलक प्रमाणात फायदा होतो . कोरोनामुळे बहुतांश गावात दारूचे अड्डे विनापरवाना चालू असताना पोलिसांनी छापे टाकले ,यातून शासनाला कुठलाही फायदा होत नसून बऱ्याचदा विषबाधाही होते .

Related Posts
1 of 2,489

 कोरोनामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागल्यामुळे थेट केंद्र शासनाकडून दारूची दुकाने सुरु करण्यासाठी क्लीनचिट भेटली आणि सरकारला घसघशीत रक्कम जमा झाली . ४ मी ला दारूची दुकाने सुरु करण्यात आली , आणि तळीरामांची एकाच झुंबड उडाली . जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १२३ कोटींचा  महसूल शासनाला मिळाला . सर्वाधिक विकली गेली ते देशी दारू , मी , जून ,  जुलै महिन्यात ३४ लाख ६६ हजार ७७ लिटर दारूची विक्री झाली , तर २० लाख ९ हजार २३६ रुपयांची विदेशी दारू आणि ११ लाख लिटर बियरची विक्री झाली . वाईन ३० हजार ६७८ लिटर विकल्या गेली . कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दारू विक्रीमध्ये घाट झाली असून आगामी काळात ती भरून काढण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती राज्य शुल्क उत्पादन विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली .  

Show Comments (2)
error: Content is protected !!
%d bloggers like this: