कोरोनामुळे जिल्हा परिषद ५० टक्के उपस्थिती

अहमदनगर- भारतासह महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या वाढताप्रभाव मुळे महाराष्ट्र मधील सर्व शासकीय विभागांमध्ये क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांना फक्त पन्नास टक्के उपस्थिती केली आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ जगन्नाथ भोर यांनी जिल्हा परिषद मध्ये क आणि ड या कर्मचाऱ्यांची येत्या ३० सप्टेंबर पर्यंत फक्त ५० टक्के उपस्थिती असावी असे आदेश दिले आहे.
या नुसार कर्मचाऱ्यांना आळीपळीने कामावर बोलवण्याचे आदेश दिले आहे. अ आणि ब वर्गतील अधिकाऱ्यांना पूर्ण शंभर टक्के कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभाग प्रमुख्याने आपापलया विभागा खाली येणाऱ्या सर्व क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना आडून पाडून कामावर बोलावे त्यांना दररोज कामावर बोलवी नये असे या आदेशात सांगण्यात आले आहे.
तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यकारी वेळेबाबत ची सवलत देण्यासंदर्भात विभाग प्रमुखांनी आपापल्या स्तरावर निर्णय घ्यावा हे निर्णय घेताना दैनिक कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी असे या आदेशात स्पष्ट केले आहे.