कोरोनारुग्णांसाठी ते हाॅस्पिटल ठरले देवतदूत…..

0 33

अहमदनगर-  काेराेना विषाणूने सर्वत्र हाहाकार केलेला असून अनेकांच्या हातचा राेजगार गेलेला आहे. काेराेनाने जिल्ह्यातील सुमारे ७० हजार जणांना आपल्या विळख्यात घेतलेले असून त्यातील सुमारे ११०० जणांचा मृत्यू झालेला आहे.

या काळात बेकारांच्या व भूकेल्यांच्या हातात अनेकांनी दाेन घास घालण्याचा प्रयत्न केलेला असला तरी वैद्यकीय क्षेत्रातील काहींनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केलेला आहे. शहरात सुमारे २९ हाॅस्पिटलमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार सुरु हाेते. त्यातील १४ हाॅस्पिटलने रुग्णांना चांगली सेवा देत काेराेनावर मात करण्यास रुग्णांना माेलाची मदत केलेली असल्याने रुग्णांसाठी हे हाॅस्पिटल देवदूतच ठऱलेले आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात काेराेनाचा रुग्ण जिल्ह्यात पहिला आढळून आला. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारने काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लाॅकडाउन केले हाेते. परंतु या लाॅकडाउन काळात तसेच त्यानंतर अनलाॅ
क सुरु झाल्यानंतर लाेकांचा प्रवास सुरु झाल्याने काेराेनाचा फैलाव वाढल्याने सर्वत्रच काेराेनाचे रुग्ण वाढू लागलेले हाेते.

या काळात प्रशासनाकडून नागरिकांना तातडीने आराेग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले हाेते. यासाठी शहरातील खासगी हाॅस्पिटल ताब्यात घेऊन तेथे काेवीड सेंटर सुरु केलेले हाेते. तसेच काही खासगी हाॅस्पिटलने स्वतः पुढाकार घेत काेवीड सेंटर सुरु करून रुग्णांवरप उपचार सुरु केले हाेते. त्यामुळे दरराेज एक हजाराच्या पुढे रुग्ण सापडत असताना रुग्णांना चांगली सेवा मिळत गेली.

Related Posts
1 of 1,291

खासगी हाॅस्पिटलकडून रुग्णांची लूट हाेऊ नये, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आलेले हाेते. या पथकांकडून शहरातील सर्वच काेवीड हाॅस्पिटलची तपासणी करून कागदपत्रे तपासण्यात येत हाेते. २९ हाॅस्पिटल पैकी १४ हाॅस्पिटलने रुग्णांना शासनान ठरवून दिलेल्या निर्देशानुसार शुल्काची आकारणी करून रुग्णांवर उपचार करून त्यांना काेराेनाच्या विळख्यातून बाहेर काढलेले आहे. प्रशासनाच्या दृष्टीने हे चाैदा हाॅस्पिलट पारदर्शक कारभार करणारे ठरलेले असून रुग्णांसाठी देवदूत ठरलेले आहेत.

रु्ग्णांसाठी काेराेनातील मंदिरे

आराेग्यम अग्रवाल हाॅस्पिटल, सुविधा हाॅस्पिटल, देशपांडे हाॅस्पिटल, दीपक हाॅस्पिटल, श्रीदीप हाॅस्पिटल, जाधव हाॅस्पिटल, अंबिका नर्सिंग हाेम, गॅलेक्सी हाॅस्पिटल, अनभुले हाॅस्पिटल, खालकर हाॅस्पिटल, बालाजी पेडीयाट्रीक अँड हाॅस्पिटल, झावरे पाटील हाॅस्पिटल अँड नर्सिंग हाेम, पाटील अक्सीडेंट हाॅस्पिटल, सिध्दीविनायक हाॅस्पिटल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: