विकासकांना प्रिमियम माफ करण्याच्या निर्णयाने ग्राहकांना फायदाच होणार- ना. जितेंद्र आव्हाड

विकासकांना प्रिमियम माफ करण्याच्या निर्णयाने ग्राहकांना फायदाच होणार- ना. जितेंद्र आव्हाड

0 24
विकासकांना प्रिमियम माफ करण्याच्या निर्णयाने ग्राहकांना फायदाच होणार- ना. जितेंद्र आव्हाड
मुंबई : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर 50 टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे . या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत दिली जाणार आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांनादेखील मिळणार आहे. मात्र यावर विरोधकांनी टिका केली आहे.  विकासकांना प्रिमियम माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका झाली. या निर्णयाबाबत बोलत असताना गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “बांधकाम उद्योग जेवढा रोजगार निर्माण करून देतो तेवढा अन्य कोणताही उद्योग देत नाही. विकासकांना प्रिमियम माफ करण्याच्या निर्णयाने ग्राहकांना फायदाच होणार आहे. बांधकाम उद्योगानेच शहराच्या महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल. तसेच मंदित गेलेला बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल.”
Related Posts
1 of 1,292
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: