कोरोनाची स्थिती आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले-पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. या अपयशावर चर्चा होऊ नये ही सरकारची भूमिका होती. असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
ते म्हणाले की केंद्र सरकार ची स्थिती ही गोंधळल्यासारखी आहे. तुम्ही मोरावर फोटो काढत बसा किंवा देवाची करणी आहे असे म्हणा तरी तुम्हाला सद्यस्थितीत परिस्थिती सावरता आली नाही. जनतेची अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकले नाही . कोरोनाची स्थिती आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले असून ह्याला लपण्यासाठी त्यांनी संसद बंद ठेवली असा आरोप त्यांनी केला.
सरकार म्हणून सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सरकार पूर्ण करू शकले नाही .जगातील कोणत्याही देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटले नाही आपल्या देशाने कोणाला देवाची करणी म्हटले आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्था ढसाळण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे.त्यामुळे त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली कारण संसदेत त्यावेळेस चर्चा होऊ द्यायची नव्हती असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिंवर लावला आहे .