
जिनीव्हा – करोना महामारीशी आज संपूर्ण जग सामना करतं आहे. करोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्न करत आहे. तरीही करोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती जागतिक आरोग्य संघटना (who) ने व्यक्त केली आहे.
सध्या जगभरात करोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत. अशात करोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. करोना व्हायरसची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यामुळे येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात ही शक्यता अधिक आहे असंही जागतिक आरोग्य संघटने म्हटलं आहे.
करोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त, रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहे तर भारतात ही एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.