कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर शाळा सुरु करणं शक्य नाही- शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

0 46

अमरावती- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावा मुळे राज्यातील सर्वच शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरु होणार अशी चर्चा आहे. परंतू जर दिवाळीनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर शाळा सुरु करणं शक्य नाही,’ असं मत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

कोरोनाची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय सुरु करु नका, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यावर अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूने ही माहिती दिली.शाळा सुरु करण्याबाबत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत.कपिल पाटील यांनी त्यांचा विचार मांडला असेल. आपण सर्वांच्या पत्राचा तसेच इतर मागण्यांचा चौफेर विचार करु, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे,’ असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Related Posts
1 of 1,357

‘दरम्यान काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते. आधी आपण ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली, संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: