कोणाचीही तक्रार नसताना तीन दिवसानंतर निवडणूक अधिकाऱ्याने चिन्हं केले बदली

0 30

श्रीगोंदा  – श्रीगोंदा तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने २२ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचे निवडणूक   चिन्ह वाटपानंतर ३ दिवसांनी बदलले असल्याने श्रीगोंदा तालुक्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा शाहूराजे शिपलकर यांनी दिला आहे.

  या बाबत सविस्तर असे की तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत निवडणुकीत २२ उमेदवार पैकी काळ भैरवनाथ पॅनलच्या ११ उमेदवारांना छत्री हे एकच निवडणुक चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी धोंडीराम मुळे यांनी दि.४ रोजी चिन्ह वाटपाच्या दिवशी दिले होते ते देत असताना विरुध्द पॅनलकडून एकच चिन्ह देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे लेखी देखील घेतले होते. मात्र एकच चिन्ह दिल्याची चुक लक्षात येताच निवडणूक आयोगाने ११ पैकी ज्ञानेश्वर शिपलकर, आशा शिपलकर,  बापू मोरे, चंद्रकला खोरे, निर्मला बागल, गिता घमडे, सविता सुपेकर या ७ उमेदवारांना तीन दिवसानंतर दि.७ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान फोनवरून ऑटो रिक्षा व गॅस सिलेंडर हे चिन्ह बदली करून दिल्याचे सांगीतल्याने उमेदवारांत एकच गोंधळ उडाला. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा शाहूराजे शिपलकर यांनी दिला आहे.

 डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद ट्विटरने घेतला निर्णय 

 निवडणुक निर्णय अधिकारी यांनी चिन्ह वाटप करताना सर्व उमेदवारांना सारखे निकष न लावता एकच चिन्ह अकरा उमेदवारांना दिले होते. मात्र  तीन दिवसांनी यातील सात उमेदवारांचे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने राजकीय दबावाला बळी पडून बदली केले असून यात आमची फसवणूक आहे या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शाहुराजे शिपलकर यांनी सांगीतले.
Related Posts
1 of 1,291

          हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यावर चिन्ह वाटप करताना काही मंडळींनी दबाव आणला त्यामुळे एकच निवडणूक चिन्ह दिले मात्र निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन करून सात उमेदवारांना त्यांनी उमेदवारी अर्जात केलेल्या मागणीनुसार नवीन निवडणुक चिन्ह दिले आहे.  –   प्रदिप पवार तहसीलदार श्रीगोंदा
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: