कॉफीचे डाग घालवायचे असतील तर करा सोपे उपाय

0 24

कॉफी खूप आवडत असली तरीही कोणत्याही आवडत्या कपड्यांवर पडलेली कॉफी मात्र आपल्याला नक्कीच आवडत नाही. कारण कॉफीचे डाग कपड्यांवरून कितीही घासले तरीही निघत नाहीत. तुम्हालादेखील हा अनुभव कधी ना कधीतरी आलाच असेल. कॉफीचे कपड्यांवर पडलेले डाग सहसा पटकन निघत नाहीत आणि हे डाग काढताना नक्कीच जीव निघतो. जरी कपडे नीट धुतले तरीही कुठेतरी त्याचा लहानसा डाग राहतोच असं तुमच्याही लक्षात आलं असेल. पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, यावर आमच्याकडे सोपा उपाय आहे तर…काही अशा गोष्टी आहेत ज्यांनी कॉफीचा डाग नक्कीच निघून जातो. फक्त त्याचा कसा वापर करायचा हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही तुम्हाला तीन सोपे हॅक्स सांगत आहोत.

सोडा वॉटर

तुम्हाला माहीत आहे का? तुमचा आवडता क्लब सोडा हा केवळ कॉकटेल अथवा मॉकटेल तयार करण्यासाठीच उपयोग पडत नाही तर याचा उपयोग तुमच्या कपड्यांवरील कॉफीचा डाग काढण्यासाठीही होतो. तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये असाल आणि जर तुमच्या कपड्यांवर अचानक कॉफी सांडली तर घाबरून जाऊ नका. तुम्ही हे डाग नक्कीच सहजपणे काढू शकता.  थोडासा सोडा घ्या आणि ज्या ठिकाणी कॉफी सांडली आहे अथवा डाग पडला आहे तिथे सोड्याने घासा. हा डाग पटकन जाण्यासाठी याची मदत तुम्ही घेऊ शकता.

लिंबाचा रस

Related Posts
1 of 44

शँपू

शँपू हा कॉफीच्या डागासाठी उत्तम मानला जातो. तुमच्या कपड्यांवर जर कॉफीचा डाग पडला असेल तर तुम्हाला त्याजागी केवळ एक थेंब शँपू घेऊन त्यात पाणी मिक्स करा. नंतर डागावर हे घासा आणि डाग पूर्ण जाईपर्यंत तुम्ही हे हलक्या हाताने घासा. तुम्ही हे केल्याने तुमच्या कपड्यांवरील कॉफीचा डाग पटकन निघून जातो. तुम्हाला जास्त रगडावेही लागत नाही. शँपूमध्ये असणाऱ्या काही केमिकल्समुळे डाग पटकन जाण्यास मदत मिळते. शँपूमध्ये असणारे सल्फेट हे कपड्यांवरील कॉफीचा डाग काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही कॉफीचा डाग कपड्यावर पडला तर त्रास करून घेऊ नका. यासाठी हे सोपे तीन उपाय करून यातून सुटका करून घेऊ शकता.

सोप्या घरगुती उपायांनी घालवा कपड्यांवरील जिद्दी डाग

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: