के . के . रेंज बाधित २३ गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयात जाणार : खा डॉ सुजय विखे


अहमदनगर : पारनेरमधील २३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर १९८० पासून के . के . रेंजचे आरक्षण असून २०२६ पर्यंत आरक्षणाला मुदतवाढ भेटली आहे . संरक्षण विभागाकडून घेतलेल्या जमिनीचा परतावा हा जमिनीच्या स्वरूपातच द्यावा लागतो , तसा कायदाच आहे परंतु राज्य सरकारने तो [पाळलेला नाही . या गावांमधील शेतकऱ्यांशी खा डॉ सुजय विखे यांनी संवाद साधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी न्यायालयात जाण्याची ग्वाही देत राज्यातील कोणत्याही सरकारने हा प्रश्न सोडविला नाही म्हणून भाजप सरकारने सोडविला नाही तरी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे असंही विखे बोलले .