केरळ मध्ये भाजपा आमदाराने केली कृषी कायदे रद्द करण्याची मागणी 

0 26

थिरुवनंतपूरम   –  केरळ विधानसभेतील  भारतीय जनता पक्षाच्या एकमेव आमदार ओ राजगोपाल यांनी वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला सभागृहात पाठिंबा दिला. केरळ विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री पिन्नाराई विजयन यांनी गुरुवारी हा ठराव मांडला होता . सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी ,विरोधी काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या पाठिंब्याने हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला .

हे पण पाहा –  जानेवारी अखेरपर्यंत आरोग्य विभागात भरती – राजेश  टोपे |

यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदार ओ . राजगोपाल यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधून आपली प्रतिक्रिया देत म्हणाले कि   मी सभागृहाच्या सर्वसाधारण मताशी सहमत आहे. ही लोकशाही वृत्ती आहे. आपण पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात असल्याचे राजगोपाल यांना सांगण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ही लोकशाही व्यवस्था आहे आणि आपण एकमताचे पालन केले पाहिजे. मात्र त्यांनी  विशेष अधिवेशनादरम्यानच्या चर्चे मध्ये सहभागी होत म्हणाले होते कि  म्हटले होते की, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि दलालांना टाळले जाईल.

Related Posts
1 of 1,301

शिवसेना आणि काँग्रेसला महाराष्ट्राला उत्तर द्यावेच लागेल!- चंद्रकांत पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: