केंद्र सरकारला आर्थिक बाबीत अजून एक झटका

नवी दिल्ली- वेगवेगळ्या देशांमधील व्यवसायिक वातावरण किती पोषण आणि देशातील आर्थिक परिस्थिती संबंधित मूल्यमापन करणाऱ्या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स मध्ये भारत या वर्षी २६ क्रमांकांनी घसरुन १०५ व्या क्रमांकावर गेला आहे.देशातील व्यापार आणि व्यवसायिक वातावरणाच्या स्वातंत्र्यासंदर्भातील परिस्थितीमध्ये भारताची जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत २६ स्थानांनी घसरला आहे.
मागील वर्षी भारत ७९ क्रमांकावर होता. अनेक छोटे देश हे या यादीमध्ये भारतापेक्षा बरेच पुढे आहे. या अहवालामध्ये १६२ देशांचा समावेश आहे.मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशांमधील सरकारांनी व्यवसाय आणि उद्योगांचा विस्तार, कायदेशीर यंत्रणा आणि संपत्तीसंदर्भातील अधिकार, जागतिक स्तरावरील व्यापाराचे स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवसाय यासारख्या व्यवसायाशी संंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर हा अहवालदर वर्षी सादर केला जातो.
व्यापार आणि व्यवसायिक घटकांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मुल्यपामन करुन प्रत्येक वेगवेगळ्या मुद्द्यांना ० ते १० दरम्यान गुण दिले जातात. यामध्ये जेवढे अधिक गुण तेवढी स्वातंत्र्य अधिक असं समजलं जातं. मागील वर्षी सरकारचा आकार आणि कामगिरी यासंदर्भात भारताला ८.२२ गुण होते. हाच आकडा १.०६ ने कमी होऊन ७.१६ पर्यंत घसरला आहे. या यादी मध्ये न्यूझीलंड हे प्रथम स्थानी तर आफ्रिका मधील कांगो हे देश अंतिम स्थानी आहे. तसेच या यादीमध्ये चीन १२४ स्थानी आहे. जपान २० व्या स्थानी आणि रशिया ८९ व्या स्थानी आहे.